कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विकास म्हात्रे यांची निवड

 


 



कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकी च्या शेवटच्या वर्षातील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शुक्रवार चांगलीच तणावाच्या वातावरणात पार पडली. पालिकेत शिवसेना, भाजप यती असताना मात्र स्थायी समितीच्या सभापती पदासाठी सेना भाजपा एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याने सनच पुरसे संख्याबळ असतानाही भाजपने काँग्रेस व मनसेच्या सदस्यांच्या जोरावर शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला सभापतीपदाचा घास खेचून घेतला.भाजपचे विकास म्हात्रे यांनी शिवसेनेचे गणेश कोट यांचा चमत्कारिक पराभव करत स्थायी समिती सभापती पदी निवडून आल्याने भाजपने पालिकेच्या तिजोरीवरहक्क प्रस्तापित केले आहे. आगामी पालिकेच्या निवडणुकीत पालिकेवरील सत्ता अबाधित राखताना शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार असन भाजपाने शिवसेना पुढे आव्हान उभे केले आहे.