लोकलच्या दरवाजावरील स्टंटबाजी बेतली जीवावर, खांबाला आदळन तरुणाचा मृत्यू


कल्याण - लोकलच्या दरवाजावर उभे राहून स्टंटबाजी करत करताना अपघात होऊन कल्याणच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान असलेल्या खाडीपुलाजवळ ही घटना घडली आहे.कल्याण च्या जुनी गोविंदवाडी परिसरात राहणारा २० वर्षीय दिलशाद खान गुरुवारी संध्याकाळी आपल्या एका मित्रासोबत मुंबई येथील गोवंडीला चालला होता. त्यावेळी दिलशाद हा लोकलच्या दारावर उभा राहून लटकत स्टंटबाजी करत होता. तर त्याचा मित्र मोबाइलवर स्टंटबाजीचा व्हिडिओ काढत होता. दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान असलेल्या खाडीपुलावर तो एका खांबाला आदळला आणि तो लोकलमधून खाली पडला. त्याचा मित्र हुसेन आणि काही लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे दिलशादच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिलशादचे काका फहीम । खान यांचे म्हणणे आहे की, त्यादिवशी दिलशाद आपल्या चुलत भावाच्या लग्नाच्या कपड्यांसाठी गोवंडीला चालला होता.  कोणताही प्रकार करू नये ज्या मळे त्यांच्या आई वडिलांना आयुष्यभर शिक्षा भोगावी लागेल, या अपघाताबाबत ठाणे जीआरपी ला विचारले असता, स्टंट ची व्हिडीओ असताना देखील असा कोणताही प्रकार माहिती नसल्याचे सांगितले.