हिंगणघाट येथील महिला निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

 अध्यापिकेच्या निधनाबद्दल राज्यपाल हिंगणघाट येथे जळीत प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या महिला भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या शोकसंवेदना कळविल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या हिंगणघाटच्या अध्यापिका असलेल्या मुलीचे नागपूर येथे निधन झाल्याचे समजून अतिशय दुःख झाले. आज संपूर्ण समाज आक्रोशित आहे. ही दुर्दैवी घटना संपूर्ण समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. आज मुली आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत. नवनवीन जबाबदाऱ्या व आव्हाने समर्थपणे सांभाळीत आहेत. महिलांचा सर्वकष उत्कर्ष होण्यासाठी समाजाचा महिलांप्रती दृष्टीकोन अधिक सकारात्मक होणे आवश्यक आहे. या दु:खद प्रसंगी मी मुलीच्या आई-वडिलांना आपल्या तीव्र शोक संवेदना कळवितो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.